शिवचरणस्पर्श

गड किल्ले

गड किल्ल्यांच्या भेटीगाठी

ट्रेकिंग

भटकंती

इतर

इतर काही

आमच्या विषयी

शिवचरणस्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट पेठ वडगांव

शिवभक्त शिवचरणस्पर्श परिवारातर्फे एक आगळी वेगळी कल्पना :
छ. शिवरायांनी रयतेसाठी उभे आयुष्य खर्ची घातले … आणि स्वतःचे साम्राज्य उभे केले…. आज वेळ आली आहे की आपणसुद्धा या सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची.
चला तर मग एक उपक्रम हाती घेऊया राजांचा एक सच्या मावळा – शिवभक्त …!!!

chatrapati-img-shivcharansparsh

नियम व अटी :
१. शिवभक्त हा निर्व्यसनी हवा.

२. प्रत्येकाने कमीत कमी ५० रु. च्या पटीत महिन्याच्या ७ तारखेपर्यंत जमा करावे.

३. प्रत्येक महिन्याची शिवभक्तांची संख्या आणि रक्कम, नियोजित कार्यक्रम, तुमचा सहभाग, शिल्लक बाकी, सर्व हिशोब महिन्याच्या ३. तारखेपर्यंत प्रत्येकाला व्यक्तिगत सांगितला जाईल.

४. तुमचा ग्रुप लीडर तुम्हाला सांगितला जाईल.

५. प्रत्येक शिवभक्ताला एक समान हक्क राहील, काम करण्याचा, सहभागी होण्याचा, हिशोब विचारण्याचा, नवीन कल्पना सुचवण्याचा.

६. विचार करा मावळ्यांनो तुम्ही एकटे ५० रु. मध्ये खूप मोठे सामाजिक कार्य करू शकत नाही पण आपण सर्व मिळून कोणतेही कार्य सहजासहजी करू शकतो.(उदा. आपण २०० शिवभक्त मिळून दार महिन्याला १०००० रु. चे काम करू शकतो)

७. शिवचरण स्पर्श चा जो राखीव, शिल्लक निधी असेल तर तो फक्त झाडे लावा झाडे मोठी करा.. यासाठीच उपयोगात आणला जाईल.

८. तुम्ही एक पाऊल पुढे टाका शिवचरण १०० पाऊल पुढे जाईल …. !!!

|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||

Read More